Rupali Chakankar vs Rohini Khadse : आमदारकीवरून रूपाली चाकणकर , रोहिणी खडसेंमध्ये जुंपली
Rupali Chakankar vs Rohini Khadse : आमदारकीवरून रूपाली चाकणकर , रोहिणी खडसेंमध्ये जुंपली
रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, अशी टीका रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केली होती. यावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर पलटवार केला आहे. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election) जवळ येत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत, अशी टीका केली होती. यावरून रूपाली चाकणकर यांनाच आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांना डिवचले होते.
रूपाली चाकणकर यांचा रोहिणी खडसेंवर पलटवार
आता रोहिणी खडसे यांच्या वक्तव्याचा रुपाली चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आमच्याकडे सीडी आहे असे सांगून राष्ट्रवादीत प्रवेश मिळवला व अजूनही ती सीडी बाहेर बाहेर आलेली नाही. वडील विधान परिषदेचे सदस्य हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. ते आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे कोणाचा कोणाला पायपोस नाही. अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षाला फसवणारे व इतरांवर टीका करणार्यांवरून त्यांची मानसिकता व बुद्धिमत्ता किती आहे? हे कळून येत आहे. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचे नाही, असा पलटवार त्यांनी केलाय. तर लोकसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार करण्याचे सोडून भाजपचा प्रचार केल्याचा आरोपही रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केला आहे. आता रोहिणी खडसे नेमकं काय प्रयुत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.