एक्स्प्लोर
Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाची दाणादाण, अनेक गावांचा संपर्क तुटला; बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो
Beed News : बीडमध्ये झालेल्या दमदार पावसाने बिंदुसरा पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. या मान्सूनमध्ये सलग चार वेळा हा पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून शहरातून जाणारी बिंदुसरा नदी खळखळून वाहतेय.
Marathwada Rain Update
1/8

बीडमध्ये झालेल्या दमदार पावसाने बिंदुसरा पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय.. या मान्सूनमध्ये सलग चार वेळा हा पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून शहरातून जाणारी बिंदुसरा नदी खळखळून वाहतेय.
2/8

बीड शहर याच बिंदुसरा नदीकाठी वसलेल आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजविला. याचा सर्वाधिक फटका आष्टी आणि गेवराई तालुक्याला बसलाय.
3/8

गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले असून शनीमंदिर, पांचाळेश्वर मंदिरं तीन दिवसांपासून पाण्याखाली आहेत.
4/8

पाटोदा तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने बिंदुसरा धरणात पाण्याची आवक वाढली त्यामुळे शहरातून जाणारी ही बिंदुसरा नदी खळखळून वाहते आहे. बीड शहराच्या मधोमध वाहणाऱ्या या नदीचे विहंगम अशी ही ड्रोन दृश्य
5/8

माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने धरणातून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर याच विसर्गामुळे सांडस चिंचोली गावाला दोन दिवसापासून पाण्याने वेढा घातल्याचे दिसून येत आहे.
6/8

या गावात जाण्यासाठी दोन रस्ते असून सिंदफणा नदीला पूर आल्यास हे रस्ते बंद होतात आणि त्यामुळे या गावाचा संपर्क तुटतो अशी माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे. दोन दिवसापासून प्रशासन संपर्कात असल्यास देखील गावकऱ्यांकडून सांगण्यात आलय.
7/8

मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तीन लाख हेक्टरचे नुकसान झालेय. तर 15 लाख 543 हेक्टरपर्यंत पिकांच्या नुकसानीचा आकडा गेला आहे. 1,48, 961 हेक्टर जिरायत, 3,861 हेक्टर बागायत तर 7,071 हेक्टर फळपिकांच यात नुकसान झालंय.
8/8

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, सिल्लोडनंतर आता कन्नड तालुक्यातील कंरजखेडा महसूल मंडळांमध्ये काल (15 सप्टेंबर) रात्रीपासुन जोरदार पाऊस चालू आहे. अद्याप अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय यात शेतीचेही नुकसान झाले आहे. तर तिकडे पुर्णा नदी दुथडी भरून वाहत आहेत.
Published at : 16 Sep 2025 09:48 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























