Rohit Pawar : PM Modi यांच्या मंत्रीमंडळात NCP ला स्थान नाही, रोहित पवार यांनी सांगितलं कारण
मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादील (NCP) मंत्रिपद मिळणार नसल्याची सध्या चर्चा सुरू आहे. यासंदर्भात सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkare) निवासस्थानी बैठक झाली. फडणवीस देखील या बैठकीला गेले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांची फडणवीसांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अजित पवारांचा मंत्रिमंडळातील सहभाग नेमका कशामुळे खोळंबला? याचे नेमके कारण एबीपी माझ्याच्या हाती लागले आहे. एक खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट देणे अशक्य असल्याने मंत्रिमंडळातील सहभाग खोळंबला अशी माहिती समोर येत आहे.
एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकूनही पदरी निराशा आली आहे. महाराष्ट्रातून सहा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे.मात्र दुपारी 2 पर्यंत देखील राष्ट्रवदी काँग्रेस अजित पवार गटाला कोणताही फोन आलेला नाही. राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल इच्छुक उमेदवार होते. मात्र प्रफुल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र सकाळी अनेकांना महाराष्ट्रातील सहा नेत्यांना फोन आले. मात्र राष्ट्रवादील आला नाही.