एक्स्प्लोर
Chandrashekhar Bawankule : नागपुरातील दुय्यम निबंधक कार्यालयात बावनकुळेंकडून झाडाझडती
नागपूरमधील प्रतापनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झाडाझडती घेतली. अनियमित पद्धतीने रजिस्ट्री केली जात असल्याच्या आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करताना बावनकुळे म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये कुठेही रजिस्टर करण्यात जाताना एकही पैसा द्यायची गरज नाहीये, ऑनलाईन आहे." त्यांनी स्पष्ट केले की, आता 'वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन' प्रणालीमुळे जिल्ह्यातील कोणतीही रजिस्ट्री कोणत्याही सब रजिस्ट्रार कार्यालयातून होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचे व्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. या प्रकरणी पैशाच्या तपासणीसाठी पोलिसांना बोलावण्यात आले असून, त्यात आढळलेल्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी नमूद केले. या झाडाझडतीमुळे अनियमितता करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















