Ramraje Nimbalkar : रामराजेंची खदखद; बैठकीत काय झालं?
Ramraje Nimbalkar : रामराजेंची खदखद; बैठकीत काय झालं?
माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर धैर्यशील मोहिते पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. गुढी पाडव्यानंतर मोहिते पाटील तुतारी हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे माढाचे खासदार रणजित निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रणजित निंबाळकर यांच्या विरोधात पहिल्या दिवशी पासून मोहिते पाटील यांच्या सुरात सूर मिसळून रामराजे निंबाळकर यांनी विरोध सुरु केला होता. त्यामुळे रणजित निंबाळकर यांना टोकाचा विरोध करणाऱ्या रामराजे निंबाळकरांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात.
रामराजे मोहिते पाटलांना छुपी मदत करणार?
रामराजे निंबाळकर हे मोहिते पाटीलांना छुपी मदत करणार असल्याच्या चर्चेने महायुतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे अजितदादांच्या बारामतीसह इतर जागांवर देखील याचे पडसाद उमटू शकतात. गेल्याकाही दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेत माढ्यातून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन सविस्तर चर्चा देखील केली होती. प्रवेश करताना अमावस्येनंतर करावा असा सल्ला निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मोहिते पाटील 9 एप्रिल रोजी तुतारी फुंकणार आहेत.