Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार
Rajya Sabha Election : राज्यात तब्बल २४ वर्षानंतर होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी जोरदार रणनीती आखण्यात येतेय. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक सहाव्या जागेसाठी लढणार असले तरी आपल्या प्रमुख उमेदवारांना दगाफटका होऊ नये यासाठी सर्वच पक्ष काळजी घेतायत. अपक्षांना गळाला लावणं दोन्ही बाजूंसाठी आव्हान आहे. त्यात कोण यशस्वी होईल तोच बाजी मारण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीनं मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतलाय. तर भाजपकडून प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तर काँग्रेसमधल्या नाराजीचा फटका त्यांच्या उमेदवाराला बसू नये म्हणून काँग्रेस नेतेही खबरदारी घेतायत.






















