Rajakiya Sholey : पाच कोटीवाल्या कारचं सांगोला कनेक्शन : राजकीय शोले : ABP Majha
Rajakiya Sholey : पाच कोटीवाल्या कारचं सांगोला कनेक्शन : राजकीय शोले : ABP Majha
राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे (Maharashtra Vidhansabha Election) निवडणूक आयोगाने (Election Commision) आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. दरम्यान, अशातच पुणे जिल्ह्यातील (Pune) भोरजवळ बड्या नेत्याशी संबंधित असलेल्या कारमध्ये मोठं घबाड सापडलंय. राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदीच्या वेळेस एका गाडीत 5 कोटींची रोकड आढळून आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. याच नाकाबंदीच्या वेळेस एका गाडीत अंदाजे पाच कोटी रुपयांची रोकड पोलिसांना आढळून आली आहे. इन्कम टॅक्स व संबंधित विभागांना या संदर्भाची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात आज (दि.21) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी घटनास्थळी दाखल अधिकची माहिती अशी की, पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर (Khed shivapur) टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान पकडली आहे. इनोव्हा क्रिस्टा ही कार आहे.ही कार सांगोल्याची आहे. नलवडे नावाच्या व्यक्तीची ही गाडी आहे. या कारमधून ही रोकड सांगोल्याला नेण्यात येणार होती. ही कार सत्ताधारी नेत्यांच्या संबंधित व्यक्तीची आहे. पुणे ग्रामी पोलिस या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. काही वेळात याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 16 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/5732630950d7ff442f95d13c0391e22c1739670953838976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![BJP On Mahapalika Election | मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8543e88a688f2ba365a7cfefca6c86781739644857936718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Job Majha : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिकल सर्विस लि. येथे नोकरीच्या संधी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/97e7a19c7a49700e5312838b1ed8655a1739631013939718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Karuna Sharma On Dhananjay Munde : संपूर्ण विषयावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सगळं सुरु:करुणा मुंडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/c65b297debb8c3a69e480086c8298e7d1739630950691718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav On Shivsena : शिवसैनिक नावाच्या निखाऱ्यावर साचलेली राख झटकावी : भास्कर जाधव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/4178e3861c5305a926100bc8ef1636a41739628665995718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)