Raj Thackeray : Mumbai Pune एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंनीही अभूतपूर्व भाष्य
लोक ३२ तास वाहतूक कोंडीत अडकलेले असताना करण्यात आलेली टोल वसुली चुकीची, राज ठाकरेंच्या एक्स पोस्टमध्ये उल्लेख, वाहतूक कोंडीच्या काळातील टोलची रक्कम सरकारने परत करावी, राज ठाकरेंची मागणी.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालात नेमकं काय? (Mumbai Pune Expressway Traffic Reason)
पुणे एक्सप्रेस वे वरील असा सांभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून कर्जत शिरूर महामार्ग सुचवला आहे. मात्र याचा प्रस्ताव हा मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात धुळ खात दोन वर्षांपासून पडला आहे. सर्व घाटमाथांवरील रस्त्यांमध्ये वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर आहे. मात्र माळशेज ते लोणावळा या घाटमाथ्यावरील रस्त्यामध्ये तब्बल 70 ते 80 किलोमीटरच अंतर आहे. त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर कितीही बदल केला तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. कर्जत शिरूर महामार्गाच काम करावंच लागेल, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई, एमएमआर रिजन, जेएनपीटीची अवजड वाहतूक यांना पुणे सोलापूर अहमदनगर हैदराबाद आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जाण्यासाठी हा एकमेव महामार्ग आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी लक्षात घेता याला पर्याय म्हणुन कर्जत शिरूर महामार्ग करावा, असा प्रस्ताव सरकारला देण्यात आलेला आहे. एकीकडे समृद्धी महामार्ग असतानाही शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा घाट सरकार करतंय, तर दुसरीकडे मात्र अशा प्रकारच्या वाहतूक कोंडीवरती मार्ग काढताना पाहायला मिळत नाही.
महत्त्वाच्या बातम्या




















