(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raigad Flood : सरकारी यंत्रणा पोहचण्यात उशीर का झाला? रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे माझावर
अतिवृष्टीमुळे सर्वात मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडलेल्या महाडमधल्या तळीये गावात ४० तास उलटून गेल्यानंतर अजूनही 44 जण बेपत्ता आहेत. काल संध्याकाळपर्यंत 38 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. दुर्गम भागातल्या तळीयेमध्ये एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस यंत्रणेकडून बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळी तळीये गावात डोंगर 32 घरांवर कोसळला. त्यानंतर आता तिसरा दिवस उजाडला तरी 40 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. रायगडमधील पोलादपूर तालुक्यातही भूस्खलनाच्या दोन दुर्घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. केवनाळे इथं 4 घरांवर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला, तर साखर सुतारवाडीत दरडीखाली 5 बळी गेले.
रायगडमधील पोलादपूर तालुक्यातही भूस्खलनाच्या दोन दुर्घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. केवनाळे इथं 4 घरांवर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला, तर साखर सुतारवाडीत दरडीखाली 5 बळी गेले.
महाड आणि पोलादपूरमधील दुर्घटनांनंतर अजूनही बचावकार्य सुरू आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी.