Rahul Gandhi Bharat Jodo Yatra:राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा 1 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतला सर्वात मोठा टप्पा आज पूर्ण झालाय. 7 सप्टेंबरला कन्याकुमारीमधून सुरु झालेल्या यात्रेला आज 38 दिवस पूर्ण झालेत. याच दरम्यान राहुल गांधींच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी 1 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. त्यानंतर कर्नाटकमधील बेल्लारीमध्ये राहुल गांधींची एक सभा झाली. त्यात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. गेल्या 38 दिवसांमध्ये राहुल गांधींची हीच यात्रा भाजपच्या निशाण्यावर होती. त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधींनी दिली. याच यात्रेचा २ हजार 750 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. 12 राज्यांमधून जाणारी ही यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. नांदेडमधून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. त्यांचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांसह अनेक नेते उपस्थित असण्याची शक्यता आहे. दरम्यान आज बेल्लारीमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप केले.