एक्स्प्लोर
Pune Politics: 'माझ्यावर MCOCA लावण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा कट', रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून महायुतीमध्ये सुरू झालेला वाद आता आणखी चिघळला असून, आमदार रवींद्र धंगेकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. 'चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत समीर पाटील माझ्यावर मोक्का (MCOCA) लावण्याचा कट रचत आहेत,' असा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. आपण सत्य बोलत असून, आपला आवाज कोणीही दाबू शकत नाही, असेही धंगेकर म्हणाले. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादात हस्तक्षेप करत 'महायुतीत दंगा नको' असा सल्ला धंगेकरांना दिला आहे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर दिला आहे. या आरोपांवर भाजपनेही प्रतिक्रिया दिली असून, पक्षात गुंडगिरीला स्थान नसल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे धंगेकरांच्या आरोपांनंतर पुणे आणि राज्यातील राजकारण तापले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
Advertisement


















