Pune : GPS मुळे विवाहबाह्य संबंधांचा भांडाफोड, हॉटेलमध्ये पतीला रंगेहाथ पकडलं ABP Majha
पुण्यात पतीच्या अफेअरचा शोध घेण्यासाठी पत्नीने चक्क जीपीएस ट्रॅकरचा वापर केलाय. या तंत्रज्ञानाद्वारे पत्नीने पतीच्या विवाहबाह्य संबंधांचं बिंग फोडलंय. उद्योजक असलेल्या पतीवर पत्नीचा संशय होता. मिटिंग्सच्या नावाने पती विविध शहरात फिरतो असं पत्नीला वाटायचं. मात्र पतीच्या वागण्यातील बदल तिला खटकू लागला. त्यामुळे तिने शक्कल लढवली आणि कारमध्ये जीपीएस बसवलं... उद्योजक पत्नी पत्नीला फसवून पुण्याला आला होता. कारचे लोकेशन अनेकदा पुण्यातच आढळू लागले.त्यामुळे पती खोटं बोलत असल्याचं त्याच्या पत्नीला लक्षात आलं. आरिफची गाडीचं लोकेशन पुण्यात आढळल्यानंतर पत्नीने गुगलवरुन हॉटेलचा नंबर मिळवला आणि चौकशी केली. चौकशीत आरिफ बावधनमधील हॉटेल व्हीव्हा ईनमध्ये असल्याचे पत्नीला समजलं. त्यावेळी हॉटेलमध्ये आरिफसह दुसरीच महिला असल्याची माहितीही हॉटेलकडून आरिफच्या पत्नीला मिळाली. त्यानंतर तिने तातडीने हॉटेल गाठत पतीला रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरिफविरोधात गुन्हा दाखल केलाय.




















