एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 

Devendra Fadnavis On Raj Thackeray : नाशिकमधील कंत्राटं स्पर्धात्मक दिले आहेत, कमी पैशात दिले आहेत. तीन प्रकारच्या गुणवत्ता तपासण्या लावण्यात आल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

मुंबई : नाशिकच्या कुंभमेळ्यातील कामांसाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणले गेलेत, वरून आदेश आल्यानंतर तसं केलं जातं, असा मोठा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. त्या आरोपांना आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. देशात किंवा राज्यात कंत्राटं देताना कुणाचीही जात किंवा भाषा, धर्म पाहिला जात नाही. ज्यांची कंत्राट पूर्ण करण्याची क्षमता आहे, त्याला कंत्राट दिलं जातं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  म्हणाले. तसेच कामांच्या गुणवत्तेची तपासणी केल्यानंतरच पैसे दिले जाणार आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

या कुंभमेळ्यासाठी अनेक कॉन्ट्रॅक्टर गुजरातमधून आणले, असं समजलं आहे. महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर जन्मलेच नाहीत का? वरून जे आदेश येतील तसे कुंभमेळे करायचे. महाराष्ट्रातील सगळ्या गोष्टी अशाच हाताळल्या जात असतील तर यांना लखलाभ असो, असं म्हणत राज ठाकरेंनी नाशिकच्या कामांवरून संताप व्यक्त केला होता.

राज ठाकरेंच्या आरोपांवर काय म्हणाले?

राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला गिरीश महाजन यांनी स्पष्ट सांगितलं आहे. कॉन्ट्रॅक्टर गुजरातचे आहेत वगैरे सगळं खोटं आहे. देशात आणि राज्यात कंत्राटं देताना जात, भाषा, धर्म पाहिलं जात नाही. ज्यांची बिड कॅपॅसिटी असते त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळतंय. त्या कंपनीच्या मागे कोण आहे हे पाहाता येत नाही. कंत्राटं स्पर्धात्मक दिले आहेत, कमी पैशात दिले आहेत. तीन प्रकारच्या गुणवत्ता तपासण्या लावण्यात आल्या आहेत. कामांची गुणवत्ता तपासणी झाल्यानंतरच पैसे मिळणार आहेत.

नाशिकच्या रस्त्यावर काय म्हणाले?

कुंभ मेळ्याची कामं सुरू असतानाही नाशिकमधील खड्ड्यांवरून अनेकदा आरोप केले जात आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिकमध्ये एमएनजीएल कंपनीला गॅस कनेक्शनसाठी पाईपलाइन टाकायला मान्यता दिली होती. त्याची कामं हळू सुरू आहेत. पाईपलाईनसाठी रस्ते उकरण्यात आले आहेत. त्यात घरोघरी कनेक्शन द्यायचे असल्याने उशीर लागत आहे. या कामांमुळे रस्ते करता येत नाहीत. आतापर्यंत दोन लाख कनेक्शन देणं आवश्यक होतं, पण फक्त 44 हजार कनेक्शनचे काम झाले आहे. कुंभमेळ्यामुळे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी अनेक संस्था कामं करत आहेत. ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत त्या ठिकाणी महापालिकेने सूचना फलक लावले पाहिजेत.

शेतकरी कर्जमाफीवर काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला अतिशय आनंद आहे, आपण अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली होती. त्यात आषाढीला पहिली यादी घोषित केली होती. ती यादी आपण ग्रामपंचायतींना पाठवली. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. ते जसजसं होईल तसतसं ही प्रक्रिया पुढे जाईल. आतापर्यंत 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि खाती नील झाली आहे. शासनाने भरलेले पैसे आणि बँकेतील पैसे सारखे असल्याने ती नील झाली आहे. जसे ऑथिंटिकेट अकाऊंट होतील तसे अकाऊंट नील होतील. पैसे टाकण्याची सुरुवात झाली आहे."

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सीबील स्कोअरची शेतकऱ्यांना काहीही समस्या निर्माण होणार नाही. कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. काही अफवा पसरवल्या जाताय, त्यात ओटीएस झालंय म्हणून सीबील लागेल. मात्र तसं नाही आहे, सीबीलची अट लागणार नाही.

ही बातमी वाचा:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Gunaratna Sadavarte and Manoj Jarange Patil: 'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
Eknath Shinde OBC : जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Embed widget