(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी! संपत्तीसाठी भावाने केला बहिणीचा खून, पुण्यातील खुनाचे रहस्य उलगडले
Pune Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी! संपत्तीसाठी भावाने केला बहिणीचा खून, पुण्यातील खुनाचे रहस्य उलगडले
पुणे: पुण्यातील नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. त्या मृतदेहाचे (Pune Crime News) गूढ उकलण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा असल्याची माहिती समोर आली आहे. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीना खानची हत्या केली आणि घरात धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर पुण्यात खूप पाऊस होता त्या दिवशी संगमवाडी येथील नदीपात्रात (Pune Crime News)फेकून दिले. त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली.
मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या हत्येचा उलगडा झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीसांनी सकिनाचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे. पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीच्या मालकीतून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ही खोली सकीनाच्या नावावर होती. सकीनाचा भाऊ आणि वहिनी तीला घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र ती जात नसल्याने तीची हत्या (Pune Crime News) करण्यात आली आहे.
या प्रकरणात पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी दिसून येत आहे. 26 ऑगस्ट रोजी शिर नसलेलं मृतदेह पुण्यातील मुठा नदीत वाह