President Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राज दौऱ्यावर ABP Majha
President Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind) आज एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर (Raigad Fort) आहेत. राष्ट्रपती हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. मात्र याला शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. खासदार संभाजी छत्रपती ( Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं.
राष्ट्रपतींच्या खासदार संभाजीराजेंनी ट्वीट करुन माहिती दिली होतीॉ. संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, "राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे."
खासदार संभाजीराजेंनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचं वैभव असलेल्या आणि स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या रायगडाच्या भेटीसाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत राष्ट्रपती कार्यालयाकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड भेटीला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, राष्ट्रपती 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपतींची रायगड भेट ही गौरवास्पद बाब असल्याचं खासदार संभाजीराजेंनी नमूद केलं आहे.