Pooja Khedkar Update : आईवडिलांचा कागदोपत्री घटस्फोट दाखवत पुजा खेडकरांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र?
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांचे आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्यामध्ये खरंच घटस्फोट झाला होता की त्यांनी घटस्फोटाचा बनाव केला होता याचा तपास होणार आहे. केंद्र सरकारने पुणे पोलिसांना तसे आदेश दिलेत. आईवडीलांचा कागदोपत्री घटस्फोट दाखवत पूजा खेडकरांनी ओबीसी नॉन क्रिमीलयर सर्टिफिकेट मिळवलं असा संशय आहे. मात्र दिलीप खेडकर यांनी नुकत्याच झालेली लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी दाखल केलेल्या प्रमाणपत्रात मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला होता. त्याचबरोबर खेडकर कुटुंबाचीयांच्या मालमत्तांचा ताबा दोघांकडे संयुक्तपणे असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे केंद्र सरकारने या दोघांमध्ये खरंच घटस्फोट झाला होता का याची तपास करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिलेत.
Manorama Khedkar: राज्यभर पूजा खेडकर (Puja khedkar) प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असताना आता मनोरमा खेडकरांच्या (Manorama Khedkar) अडचणीत वाढताना दिसत आहेत. मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी जाताना वापररलेली कार आता पोलिसांनी जप्त केली आहे.
दरम्यान, आयएएस पूजा खेडकरवर क्राइम ब्रॅन्चने (Crime branch) गुन्हा दाखल केल्यानंतर पूजा खेडकरचे दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दिल्ली क्राईम ब्रांचकडे पूजा खेडकरच्या दिल्लीवारीची कोणतीही माहिती नाही . तसेच तसेच दिल्ली क्राइम ब्राँचने खेडकर यांना बोलावण्याविषयीच्या वृत्ताला त्यांनी फेटाळून लावले आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या घरातून आता टोयोटा कार पोलिसांनी जप्त केली आहे.