(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja khedkar Certificate : पूजा खेडकरांचं अपंगत्व प्रमाणपत्र खोटं असण्याची शक्यता
Pooja khedkar Certificate : पूजा खेडकरांचं अपंगत्व प्रमाणपत्र खोटं असण्याची शक्यता
ऑर्थोपेडिक विभागाच्या शिकाऊ डॉक्टरांनी (SIB SR) अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी तपासणी कशी काय केली? # पूजा खेडकरांच्या म्हणण्यानुसार 2018 मध्ये डाव्या गुडघ्याच्या गादीला (दोन हाडांना जोडणारा भाग ) इजा होती, मात्र त्यावेळचा पुरावा डॉक्टरांनी का मागितला नाही? # त्यावेळी ऑपरेशन झालं होतं, म्हणजे वैद्यकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार ते काही महिन्यांमध्ये कायमस्वरूपी बरं झालं असणार. # अशाप्रसंगी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी एमआरआय रिपोर्ट का घेतला नाही? # शिकाऊ डॉक्टरांनी केवळ हाताने डाव्या गुडघ्याची तपासणी केली अन पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के आधु असतील, असा सकारात्मक (पॉझिटिव्ह) अहवाल कसा काय दिला? # मात्र फिजिओथेरपीस्टच्या तपासणीत डाव्या गुडघ्यात कोणती ही इजा आढळली नाही. # चालताना तिरका पाय पडत नाही अथवा कोणता त्रास होत असल्याचं ही आढळलं नाही. # फिजिओथेरपीस्टने नकारात्मक अहवाल दिला असताना मग अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे काय दिले? # दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने वायसीएमच्या खोट्या अपंगत्वाच्या आधारे पूजा खेडकर शासकीय सेवेत दाखल झाल्यात का? ही घेतलेली शंका उपस्थित झालेल्या या प्रश्नांनी खरी ठरताना दिसते. # मात्र तरी ही वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंनी हे अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट नाही, हा दावा कशाच्या आधारे केला?