Pooja Khedkar Case | पूजा खेडकरांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटे आहे?चौकशी करणारे अधिष्ठाता म्हणाले...
पूजा खेडकर यांनी आय ए एस होण्यासाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचं उघड झाल्यानंतर देशभरात असे अनेक प्रकार घडल्याच्या चर्चा सुरु झाल्यात . दिव्यांगा ची खोटी प्रमाणपत्र सादर करून याआधी अनेकजण आय ए एस बनल्याचं बोललं जातंय . या चर्चांना पुष्ठी देणारे पुरावे निखिल शेडगे या जन्मतः पंच्याहत्तर टक्के अंध असलेल्या तरुणाने जमा केलेत . निखिल शेडगेने दोनवेळा यु पी एस सी ची मुख्य परीक्षा दिलेली असून तो सध्या राज्याच्या गृह विभागात कार्यरत आहे . मात्र यु पी एस सी ची परीक्षा देताना निखिलच्या हे लक्षात आलं की दिव्यांगांची खोटी प्रमाणपत्रं सादर करणाऱ्यांकडून आपला हक्क हिरावून घेतला जातोय . त्यानंतर निखिल शेडगे यांनी याबाबत न्यायालयात पुराव्यानिशी याचिका दाखल केलीय . ज्यामध्ये एकाच उमेदवाराला वेगवगेळ्या सरकारी रुग्णालयातून दिव्यंगत्वाचं वेगवेगळं प्रमाण दर्शवणारी प्रमाणपत्रं कशी देण्यात आली हे दिसून येतंय . ज्या उमेदवाराला एका सरकारी रुग्णालयाकडून वीस टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं . मात्र त्याच उमेदवाराला दिल्लीतील एम्स रुग्णालयाकडून कधी पंच्याहत्तर टक्के तर कधी साठ टक्के तर कधी अठ्ठावन्न टक्के प्रमाणपत्रं देण्यात आल्याचं समोर आलंय . हे सर्व उमेदवार या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या उपयोग करून पुढे आय ए एस बनलेत आणि कोणी हिमाचल प्रदेशमध्ये , कोणी उत्तराखंडमध्ये तर कोणी हैद्राबादमध्ये काम करतोय . आम्ही या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत नसलो तरी हे अधिकारी आय ए एस कसे बनलेत हे निखिल शेडगेंकडे असलेल्या पुराव्यांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय .