(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Political Leaders Property Special Report : संपत्तीवरून वाद,आरोपांची वात ; सात उमेदवार टार्गेट
Political Leaders Property Special Report : संपत्तीवरून वाद,आरोपांची वात ; सात उमेदवार टार्गेट
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत नुकतीच संपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षाचे नेते आणि अपक्षांनी मोठ्या प्रमाणावर निवडणुकीचे फॉर्म भरले. यावेळी उमेदवारांनी आपापल्या संपत्तीचा तपशील (election affidavit wealth) निवडणूक आयोगापुढे सादर केला. यामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी महायुतीच्या सात नेत्यांच्या संपत्तीत झालेल्या प्रचंड वाढीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चतुर्वेदी यांनी 7 नेत्यांची नावं ट्विट केली आहेत. यामध्ये गीता जैन, पराग शाह, राहुल नार्वेकर, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. अपक्ष आमदार असेल्या गीता जैन यांची संपत्ती 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी 70.44 कोटी इतकी होती. मात्र, त्यांनी यंदा सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा आकडा 392.30 कोटी रुपये इतका आहे. याचा अर्थ गेल्या पाच वर्षांमध्ये गीता जैन यांची संपत्ती तब्बल 322 कोटी रुपयांनी वाढला आहे.