ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 04 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 04 January 2024
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक, आणखी एका आरोपीलाही पुण्यात पोलिसांकडून बेड्या..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉ. संभाजी वायबसे, त्यांच्या वकील पत्नीसह आणखी एकजण एसआयटीच्या ताब्यात, रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी, मुख्य आरोपीला वायबसेंनी पैसे पुरवल्याचा संशय
परभणीत आज सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मूकमोर्चा, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी, मनोज जरांगे, आमदार धस, ज्योती मेटेही सहभागी होणार
इलेक्शन फंडिंगच्या प्रकऱणातून संतोष देशमुखांची हत्या, आमदार जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप...हत्या प्रकरणातील काही जणांची बदली वाल्मिक कराडने केल्याचा सुरेश धस यांचा दावा...
ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण बनवणारं महाराष्ट्र होणार पहिलं राज्य...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश...गिरणी कामगारांसाठी एक लाख घरं बांधण्यात येणार...
कांद्यावरचं निर्यात शुल्क माफ करावं, शरद पवारांची चाकणमधल्या कार्यक्रमात मागणी, नाशिक दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंगांचं मात्र मागणीकडं दुर्लक्ष..
राष्ट्रवादीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, पालकमंत्रीपदावर खलबतं, अजित पवार घेऊ शकतात दोन जिल्ह्यांची जबाबदारी
नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्हीआयपी प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव, शुक्रवारी मुंबईत एकमताने निर्णय
कुर्ला बस अपघातातील चालक संजय मोरेच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल, बसचालकामुळेच अपघात झाल्याचा सरकारचा दावा तर अपघात तांत्रिक कारणांमुळे, संजय मोरेचा दावा