Phaltan Ramraje Naik Nimbalkar : वेळ आहे, अजूनही माढ्यातला उमेदवार बदला : रामराजे
Phaltan Ramraje Naik Nimbalkar : वेळ आहे, अजूनही माढ्यातला उमेदवार बदला : रामराजे
माढ्यातला उमेदवार अजूनही बदला असं रामराजे निंबाळकरांनी पुन्हा एकदा महायुतीला सांगितलंय. भाजपने विद्यमान खासदार आणि रामराजे निंबाळकरांचे कट्टर विरोधक रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे रामराजे निंबाळकर नाराज आहेत. दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतो असं रामराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक जाहीर मेळावा फलटणमध्ये घेतला. संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी यावरती कार्यकर्ते ठाम होते.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
