एक्स्प्लोर
Satara Doctor Crime : PI बदनेने 4 वेळा अत्याचार केला, हातावर सुसाईड नोट, डॉक्टरनं आयुष्य संपवलं
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे समोर आली आहेत. ‘PSI गोपाळ बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला,’ असा मजकूर मृत डॉक्टरच्या हातावर लिहिलेला आढळल्याने प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमागे पोलिसांवरच बलात्काराचा आरोप झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















