Paris Olympics 2024 ऑलिम्पिकसाठी पॅरिस सज्ज, सुरक्षाव्यवस्था कडेकोट; जगभरातून खेळाडू आणि पर्यटक दाखल
Paris Olympics 2024 ऑलिम्पिकसाठी पॅरिस सज्ज, सुरक्षाव्यवस्था कडेकोट; जगभरातून खेळाडू आणि पर्यटक दाखल
रस्त्यावर पोलीस, आकाशात लढाऊ विमाने! ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये कडेकोट बंदोबस्त ऑलिम्पिक क्रीडामहोत्सव आता तोंडावर येऊन ठेपलाय. क्रीडाविश्वातील या सर्वोच्च स्पर्धेसाठी पॅरिसनगरी ऑलिम्पिकमय झालीय. स्पर्धा आयोजकांनी वर्षभरापूर्वी 'फ्रान्सची राजधानी पॅरिस ही जगातील सर्वात सुरक्षित जागा असेल,' असे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पॅरिसमधील रस्त्यांवर पोलिसांचा पहारा आणि आकाशात लढाऊ जेट विमानांच्या घिरटय़ा असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पॅरिसच्या रस्त्यारस्त्यांवर जिकडेतिकडे पोलीसच दिसत आहेत. पोलिसांच्या मदतीला सैन्यदलालाही पाचारण करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत ऑलिम्पिक खेळ गावात अर्धा तासात मदत पोहोचेल, अशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभ होणाऱ्या सीन नदीच्या किनाऱ्यावर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.