Vitthal Mandir Pandharpur : काचपेटीतून घ्यावं लागणार विठुरायाचं दर्शन, कामामुळे चरणस्पर्श दर्शन बंद
Vitthal Mandir Pandharpur : काचपेटीतून घ्यावं लागणार विठुरायाचं दर्शन, कामामुळे चरणस्पर्श दर्शन बंद
आजपासून लाखो विठ्ठल भक्ताने विठुराया आणि रुक्मिणी मातेचे मुख दर्शन काचपेटीत घ्यावे लागणार असून गाभाऱ्यातील मार्बल आणि ग्रॅनाईट फारशा हटविण्यास सुरुवात झाली आहे . मंदिर विकास आराखड्यातील विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातील कामासाठी १५ मार्च पासून देवाचे पायावरील दर्शन बंद करून केवळ पहाटे सहा ते अकरा असे पाच तास मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती . आता थेट देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट आणि मार्बल चे फ्लोरिंग आणि भिंतीवरील फारशा काढण्याच्या कामास सुरुवात होणार असल्याने मूर्तीच्या संरक्षणासाठी दोन्ही मूर्तींवर अन ब्रेकेबल काचेची पेटी रात्री बसविण्यात आल्याने आता भाविकांना काचपेटीतील देवाचे मुखदर्शन घ्यावे लागणार आहे .
मंदिर गाभाऱ्यातील काम सुरु केल्यावर देवाचा चांदीचा दरवाजा , चौखांबी मधील चांदीचा दरवाजा , देवाच्या मूर्तीशेजारी असणारे चांदीचे मखर तसेच देवाच्या शयनगृह येथील चांदी आणि गरुड खांबावरील चांदी कालपर्यंत काढण्यात आली आहे . त्यामुळे आता संपूर्ण मंदिर गाभारा , सोळखांबी , चौखांबी याचे मूळ दगडी रूप दिसू लागले आहे . मंदिर गाभार्या बाहेर असणारे चकचकीत फरशांचे फ्लोरिंग काढण्यात आले असून मूळ काळ्या पाषाणातील दगडी फ्लोरिंग आता दिसू लागले आहे .