Operation Sindoor Inside Story : 'ऑपरेशन सिंदूर'ची इनसाइड स्टोरी एबीपी माझावर ABP Majha EXCLUSIVE
Operation Sindoor Inside Story : 'ऑपरेशन सिंदूर'ची इनसाइड स्टोरी एबीपी माझावर ABP Majha EXCLUSIVE
ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तान आणि नेपाळ सीमेला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. अमित शाह यांनी या बैठकीत भारताच्या सीमेवर जे भडकवण्याचा प्रयत्न करतात, जे आमच्या सेनेला ललकारतात आणि जे आमच्या निर्दोष लोकांना मारतात अशा लोकांना ऑपरेशन सिंदूर हे सडेतोड उत्तर असल्याचं म्हटलं.
अमित शाह यांनी पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमांना लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी सर्व राज्याच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे आभार मानले. अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला नजरअंदाज न करता ऑपरेशन सिंदूर द्वारे योग्य उत्तर दिल्याचं म्हटलं. ज्यामुळं जगात एक कडक संदेश गेला आहे. ऑपरेशन सिंदूर भारताला आव्हान देणाऱ्यांना सडेतोड उत्तर आहे.
विशेष गोपनीय माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद विरोधी अभियान सुरु करुन सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या मूलभूत रचनेवर हल्लाबोल केला. अमित शाह यांनी मोदी सरकारचं हे दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणाचं निदर्शक असल्याचं म्हटलं.



















