Om Birla on Parliament Security Breach : संसदेतील घुसखोरीप्रकरणी चौकशी सुरु, काय म्हणाले अध्यक्ष?
Om Birla on Parliament Security Breach : संसदेतील घुसखोरीप्रकरणी चौकशी सुरु, काय म्हणाले अध्यक्ष?
Security Breach in Lok Sabha: संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान एका तरुणानं सभागृहात प्रवेश केला. संसदेत (Parliament Winter Session 2023) प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सुरक्षा भेदल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. प्रेक्षक गॅलरीतून (Audience Gallery) दोघांनी उडी मारल्याने भर लोकसभेत (Lok Sabha) एकच हल्लकल्लोळ माजला. त्याचदरम्यान लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात (Security Breach) घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील (Maharashtra News) लातूर जिल्ह्यातला (Latur District) आहे. लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही 42 वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर 25 वर्षीय अमोल शिंदे (Amol Shinde) हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.