Traffic Rules : चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर बसवून बाहेर पडताय? जाणून घ्या नवे नियम
तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना दुचाकीवरुन फिरवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे... कारण आता 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकीवर बसवायचं असेल तर त्यांना हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणं अनिवार्य करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं यासंदर्भात अधीसूचना जारी केली आहे.तर, मुलं दुचाकीवर बसल्यानंतर दुचाकीचा वेग फक्त 40 किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवावा लागणार आहे. या नव्या वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर, चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.






















