Neet Paper Leak : नीट घोटाळ्याचा लातूर पॅटर्न उघड; दोन आरोपी शिक्षकांना बेड्या
Neet Paper Leak : नीट घोटाळ्याचा लातूर पॅटर्न उघड; दोन आरोपी शिक्षकांना बेड्या वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेतील (नीट) गैरव्यवहारात सहभागाच्या संशयावरून गुन्हा दाखल झालेल्या चौघांपैकी संजय जाधव व जलील पठाण या दोन जिल्हा परिषद शिक्षकांना नांदेड एटीएसने अटक केली..पोलिसांनी जाधव, पठाण व उमरगा आयटीआयमध्ये नोकरीस असलेल्या इरान्ना कोनगलवार याच्या घराची झडती घेतली. त्यात ‘नीट’च्या १२ विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट व सहा मोबाइल जप्त करण्यात आले. यात जाधवचे २, पठाणचे ३, तर कोनलगवारचा १ मोबाइल आहे. कसे चालायचे रॅकेट - जलील पठाण - आरोपी पठाण विद्यार्थी हेरून गुण वाढवण्याचे अामिष दाखवायचा. त्यासाठी ५ लाखांचा रेट होता. ५० हजार अॅडव्हान्स व हॉलतिकीट संजय जाधवकडे पाठवायचा. संशयित शिक्षकांकडे ज्या १२ विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे सापडली त्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांनही पोलिस चौकशीसाठी बोलावणार आहेत. यापैकी तीन पालक आणि विद्यार्थ्यांची सोमवारी प्राथमिक चौकशी करण्यात अाल्याची माहिती सूत्रांनी दिली. संजय जाधव - मोबाइलवरून इच्छुक विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे, अॅडव्हान्स पैसे जमा करून उमरग्याच्या इरान्ना कोनगलवारकडे पाठवून द्यायचा. इरान्ना कोनगलवार- जाधवकडून आलेला डेटा व पैसे दिल्लीत राहणारा सूत्रधार गंगाधर मुंडे याच्याकडे पाठवायचा. गुणवाढ होईपर्यंत पाठपुरावा करायचा गंगाधर मुंडे - ज्या मुलांचे पैसे प्राप्त व्हायचे त्यांचे नीट परीक्षेत गुण वाढवणे, त्यांना आधी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणे ही कामे गंगाधर मुंडे करायचा.