Sharad Pawar at PM Program : पवार कार्यक्रमात तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते विरोध करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत.. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार गट आणि ठाकरे गटाचाच मोदींना पुरस्कार देण्याला विरोध आहे.. या पुरस्कार वितरण सोहळ्यात शरद पवारांनी सहभागी होऊ नये असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे.. मात्र पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात जाण्यावर शरद पवार ठाम आहेत.. त्यामुळे विनंती करण्यासाठी जाणाऱ्या मविआच्या नेत्यांनी पवारांकडे जाणं टाळलंय.. त्यामुळे शरद पवार कार्यक्रमात तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते विरोध करणार असल्याचं चित्र पाहायला मिळणारे...






















