Navneet Rana on Amravati Lok Sabha : भाजपकडून उमेदवारी जाहीर, नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया
Navneet Rana on Amravati Lok Sabha : भाजपकडून उमेदवारी जाहीर, नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहारच्या बच्चू कडू यांच्यानंतर आता भाजप सुद्धा मैदानात उतरली आहे. अमरावतीमधील स्थानिक भाजप नेत्यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अमरावतीच्या भाजप नेत्यांनी केली. काल रात्री त्यासाठी नागपुरात थेट उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही घेतली. गेल्या वेळी नवनीत राणा यांनी पुरस्कृत अपक्ष म्हणून जागा लढवली होती, शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांना पराभवाचा धक्का देत त्या निवडून आल्या होत्या. आणि हे सगळे होत असताना आज संध्याकाळी अगदी नुकतीच आली मोठी बातमी ... नवनीत कौर राणा भाजप उमेदवार म्हणून, कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार ... भाजपाने सगळं विरोध झुगारत नवनीत राणा यांना मैदानात उतरवले... उमेदवारीची घोषणा होताच नवनीत राणांचं अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानी उसळली... नवनीत राणा उद्या मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर तात्काळ दिल्लीत अमित शाहांच्या भेटीसाठी रवाना होणार आहे.. त्यानंतरच त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे... सर्वात जास्त विरोध महायुतीच्या आतून आहे पण बाहेर नवनीत राणांच्या कास्ट सर्टिफिकेट्चा कोर्टात निर्णय प्रलंबित आहे.. भाजपकडून राणांना मिळालेल्या उमेदवारीवर काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्या पाहूया...