Navneet Rana PadYatra | नवरात्री निमित्ताने राणा दाम्पत्याची अंबादेवी मंदिरात पदयात्रा
Navneet Rana PadYatra | नवरात्री निमित्ताने राणा दाम्पत्याची अंबादेवी मंदिरात पदयात्रा
आज राणा दाम्पत्याची नवरात्री निमित्ताने अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी पदयात्रा काढली.. यावेळी नवनीत राणा यांनी भाजपला अमरावती जिल्ह्यात पाच जागी कमळ चिन्हावर उमेदवार निवडून यावं असं साकडं घातलं तर आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीला चार जागा मिळाव्या असं साकडं घातल्याने आता अंबादेवी कोणाला आशीर्वाद देईल हे पाहावे लागेल.. राणा दांपत्य शंकर नगर येथील गंगा सावित्री निवासस्थान येथून अनवाणी पायाने आज अंबा-एकविरा माता देवस्थान येथे शेकडो भक्त-स्वाभिमानी शिलेदारांसमवेत महापदयात्रा काढत देवीची महाआरती केली.. दरवर्षी राणा दांपत्य विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी मंदिरात पदयात्रा काढत दर्शनाला जात असतात.. यावर्षी सुद्धा पदयात्रा काढत नवनीत राणा आणि रवी राणा दर्शनासाठी गेले.. यावेळी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, व्यापारी, उद्योजक, जेष्ठ नागरिक, बेरोजगार युवक युवती, विदयार्थी, गृहिणी यांच्या जीवनात सुख समृद्धी शांती यावी आणि प्रत्येकाचे मंगलमय कल्याण व्हावे अशी प्रार्थना अंबानगरीचे आराध्य दैवत आई अंबादेवी आणि आई एकविरा देवीचे चरणी प्रार्थना करणार.. यावेळी नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यात पाच जागा ह्या भाजपच्या निवडून यावे अशी प्रार्थना केली सोबतच मागील वर्षी पदयात्रेत अंबादेवीला साकडं घातलं होतं की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावं ते झाले.. यावर्षी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना करणार आणि ती पूर्ण होईल असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला....