Nasim Khan on BJP | मुस्लीम समाजाला धमक्या देणाऱ्या भाजपा नेत्यांवर कारवाई कधी करणार? -नसीम खान
Nasim Khan on BJP | मुस्लीम समाजाला धमक्या देणाऱ्या भाजपा नेत्यांवर कारवाई कधी करणार? -नसीम खान
मुस्लीम समाजाला उघड उघड मारण्याची धमकी भाजपा-शिंदे सरकारचे नेते सातत्याने देत असतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही उलट त्यांचे समर्थनच केले जाते. मदरसे बंद करण्याची धमकी दिली जाते असे असताना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मदरश्यातील शिक्षकांचे मानधन वाढवण्यामागे मुस्लीम मतांवर डोळा असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे CWC सदस्य व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, मदरश्यांमधील डी. एड. व बी. एड. शिक्षकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवलही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा-शिंदे सरकारचा हा निर्णय मुस्लीम समाजाचा विकास व्हावा या हेतूने घेतलेला नाही तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय आहे. तरीही या निर्णयाचे आम्ही स्वागतच करीत आहे. भाजपा-शिंदे सरकारचे ‘सब का साथ, सब का विश्वास’ हे फक्त बोलण्यापुरते आहे, कृतीतून ते कधीच दिसत नाही.