Nashik Dargah : दर्ग्यावर कारवाई, राजकारणाची घाई, परिसरात तणाव कायम
Nashik Dargah : दर्ग्यावर कारवाई, राजकारणाची घाई, परिसरात तणाव कायम
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्गा प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली असून याप्रकरणी खुलासा मागितला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत नाशिक महापालिकेने 1 एप्रिलला दर्गा अनधिकृत ठरवत 15 दिवसांच्या आता अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा महापालिका (Nashik Mahanagarpalika) अतिक्रमण काढेल अशी नोटीस बजाबली होती. या नोटीसला दर्ग्याच्या (Satpeer dargah) विश्वस्त मंडळाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याचिकाकर्तेचे म्हणणे ऐकून घेतले नाही, तातडीची सुनावणी केली नाही असा दावा करत दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी बुधवारी सुनवणी पार पडली, सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत प्रश्न उपस्थित केले.





















