Narendra Patil : भाजपच्या चिन्हावर सातारा लोकसभा लढवण्याची संधी मला द्या, नरेंद्र पाटलांची मागणी
Narendra Patil : भाजपच्या चिन्हावर सातारा लोकसभा लढवण्याची संधी मला द्या, नरेंद्र पाटलांची मागणी उदयनराजे यांच्या पुढे कोणताही उमेदवार लढण्यासाठी नव्हता मात्र पक्षाने दिलेल्या आदेशाने निवडणूक लढवलेली. आजही माझा दावा सातारा लोकसभेच्या जागेवर आहे. भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी द्यावी ही ईच्छा आहे. खासदार म्हणून मला चांगली काम करण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागासह शहरी भाग ,राज्यात चांगला जनसंपर्क आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे मला न्याय देतील . माथाडी कायद्यावर खदखद माथाडी मध्ये गुंड प्रवृत्ती वाढत चालली आहे, पैसे घेतल्या शिवाय निर्णय घेत नाहीत, यात परिवर्तन व्हावे असे वाटते, सध्या खासदारकीची निवडणूक आहे, येणार्या काळात विधानसभा निवडणुक असेल त्यामुळे चांगला कामगार नेता,मंत्री जर ह्या राज्याला मिळाला तर चांगले आहे, नाहीतर परिस्थिती आज जी आहे त्यापेक्षा वाईट असू शकते. मराठा आरक्षण/आक्रमक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतले आहे, मात्र यापूर्वी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरे, असतील यांना निर्णय घेता आला नाही.