![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Narayan Raneरत्नागिरी पोलिस नारायण राणेंना रायगड पोलिसांच्या ताब्यात देणार,राणे महाडमध्ये होणार दाखल
मुंबई : कोकणात राजकीय घडामोडींना वेग आला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. संगमेश्वरमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पेलिसांनी अटक केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेशी चर्चा केली. त्यावेळी नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते. नारायण राणेंना अटक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात अटकाव केल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे या नंतर आता शिवसेना विरुध्द पंतप्रधान मोदी असा दुसरा अंक सुरु होणार आहे.
![Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/7223d93976f32a9a5fc5f1f1bfd5e44c1720366169573976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/d5b36ebc8af5d965c4ccde14d7c2ba7c1720363285460976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/71ca8d191bde3c8c7926f29177200e241720363623198976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/bae7b35b2ab1dc158217bc7025592b871720362912774976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/1f1b5dd05fb4c67ea9c584cef96e59511720360843988976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)