(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MVA Sabha : काँग्रेसला पावसाचा तर राष्ट्रवादीला उन्हाळ्याचा त्रास, मविआची वज्रमूठ सैल
MVA Sabha : काँग्रेसला पावसाचा तर राष्ट्रवादीला उन्हाळ्याचा त्रास, मविआची वज्रमूठ सैल
भाजपला टक्कर म्हणजे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा. पण हीच वज्रमूठ आता सैल पडू लागलीय. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. त्यातच पुण्यासह कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथे नियोजित केलल्या वज्रमूठ सभा रद्द झाल्यात जमा असल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये वज्रमूठ सभांबाबत एकवाक्यता दिसत नाहीए. पावसाचं कारण देत सभा रद्द झाल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येतंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उन्हाचं कारण देताय. तिकडे प्रफुल्ल पटेल सभा पुढे ढकलल्याचं सांगतायत. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी मात्र सभा होणार असल्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे यांचा पावसाळा, त्यांचा उन्हाळा आणि वज्रमूठ सभांवर अवकळा. असं काहीसं चित्र निर्माण झालंय.