एक्स्प्लोर
Bala Jagtap : 'राज ठाकरे सोडा, आम्ही Uddhav Thackeray यांच्यासोबतही लढणार नाही', Bhai Jagtap यांचे विधान
काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या एका विधानाने महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) खळबळ उडवून दिली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात पुन्हा एकदा भेट झाली आहे. 'मुंबईत राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस लढणार नाही', असे खळबळजनक वक्तव्य भाई जगताप यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची संधी देण्याची मागणी केली. एकीकडे जगताप यांनी युतीला स्पष्ट नकार दिला असताना, काँग्रेसचेच दुसरे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र राज ठाकरेंच्या संभाव्य युतीचे स्वागत करण्याची भूमिका मांडली. दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडींवर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर मनसेने मात्र 'राजसाहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल' अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















