Mumbai Water Issue Special Report : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक
Mumbai Water Issue Special Report : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक उंचच उंच इमल्यांच्या मुंबईचं महाराष्ट्रासह अवघ्या देशाला मोठं आकर्षण असतं. मुंबई म्हणजे सगळ्या सुविधांचं माहेरघर, असा सगळ्यांचा समज असतो. पण त्याच मुंबईच्या नागरिकांसमोर यंदा पाण्याची समस्या खूपच गंभीर बनलीय. मुंबईसाठीच्या धरणक्षेत्रावर वरुणराजा रुसल्यामुळं पाण्याचा साठा प्रचंड घटलाय. त्यामुळं मुंबईत आधीपासूनच १० टक्के पाणीकपात सुरूय. त्यात आता मुंबईकरांच्या पाण्याच्या वापरावरही निर्बंध घालण्याचा विचार सुरू झालाय. त्यामुळं मुंबईकरांसमोरची चिंता आणखी वाढलीय. पाहूयात ऐन पावसाळ्यात मुंबापुरीवर कशी लागू झालीय पाणीबाणी. मुंबई गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या धरणक्षेत्रांत पावसाने पाठ फिरवली असून , पाणीसाठा कमी होत आहे . त्यामुळे मुंबई महापालिकेने दहा टक्के पाणी कपात केलेली आहे. त्यात अजूनही मुंबईत पावसाचा काही पत्ता नाही. त्यामुळे मुंबईकरांचे पाणी संकट अधिक गडद होत चालले आहे.त्यात आता मुंबई महापालिका पाणी वापरावर निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे. मुंबईत पाणी संकट घोंगावतेय पाहूया त्यावरचा एक विशेष रिपोर्ट
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d877e01e65ffa6ad741d16fb30b06fd71739886484727977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/317ce4712984847b3864b7b10235449d1739884286047977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas on Dhananjay Munde Meets | आजारी असल्यामुळे माणुसकीच्या नात्याने मुंडेंना भेटायला गेलो- सुरेश धस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/e68f96642d2e022842e57fe57616c8b31739877995977977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)