#Corona मुंबई-पुण्यातून येणाऱ्यांची लातूरमध्ये तपासणी, नांदेडमध्येही वाढत्या कोविडमुळे कडक निर्बंध
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टोरेंट, खाद्यगृह, परमिट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे वरील आस्थापनांवर उपजिवीका अवलंबून असलेल्यांना अर्थिक अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन तसेच नागरिकांच्या सोयीसाठी वरील आस्थापनांना पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्याने 31 मार्चपर्यंत बंद राहतील, असे आदेश देण्यात आले आहेत.
Nanded Corona Update : नांदेड जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध, बार, जीम, हॉटेल्स बंद





















