एक्स्प्लोर
Ghatkopar-Versova मार्गावर तांत्रिक बिघाड, Metro One ची सेवा विस्कळीत, प्रवासी अडकले
मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रो वन सेवेत तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. 'पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकामध्ये कुणालाही सोडत नाहीयेत', यामुळे स्टेशन परिसरात प्रचंड गर्दी झाली असून प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने, कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. घाटकोपर ते वर्सोवा या ११.४ किमीच्या मार्गावर हा बिघाड झाल्याने अनेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. मेट्रो प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, सेवा पूर्ववत होण्यास विलंब होत असल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















