एक्स्प्लोर
TOP 25 Superfast News : 7 PM : टॉप 25 बातम्या : 13 OCT 2025 : ABP Majha
राज्यात मनसे पुन्हा आक्रमक झाली असून, ट्रेनमध्ये मराठी पुरुषाशी वाद घालणाऱ्या एका हिंदी भाषिक महिलेला मनसे कार्यकर्त्यांनी कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘सरकारनं शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज दिलं, लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यामुळे बजेटमध्ये थोडंबहुत मागेपुढे होतं,’ अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. दुसरीकडे, नागपूरच्या वालाडोंगरी नगरपरिषदेत एकाच पत्त्यावर २६० मतदार नोंदवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने केला आहे. साताऱ्यात यशवंत बँकेत ११२ कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर गोरेगावकर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. तर, विनोदी कलाकार ओमकार भोजने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात परतला असून दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















