एक्स्प्लोर
Voter List Row: 'मी बाहेरुन वीस हजार मतदान आणलं', MLA Vilas Bhumre यांच्या वक्तव्याने खळबळ
पैठणचे (Paithan) आमदार विलास भुमरे (Vilas Bhumre) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांकडून मतदान यादीत (Voter List) घोळ असल्याचा आरोप होत असतानाच भुमरेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. 'विधानसभेला वीस हजार मतदार बाहेरुन आणल्याचं' वक्तव्य आमदार विलास भुमरेंनी केलंय. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी इशारा करताच, त्यांनी आपले शब्द बदलत, मतदार बाहेरून आणले म्हणजे माझ्या मतदारसंघातून स्थलांतरित झालेल्या वीस हजार मतदारांना मतदानासाठी परत आणले, असे स्पष्टीकरण दिले. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर, आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
















