Vinayak Mete Accident : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मेटेंच्या वाहनाला अपघात, मेटेंचं अपघाती निधन
शिवसंग्राम संघटेनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालंय... मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ हा अपघात झालाय... अपघातानंतर त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मेटे यांचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांनी सांगितलं. विनायक मेटे आपले सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी मेटे मुंबईला येत होते. प्रवासात असतानाच मेटे यांच्या वाहनाला अपघात झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं. मराठा समाजासाठी लढणारा नेता हरपल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांकडून व्यक्त होतेय...



















