गणेश चतुर्थीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद असणार? बँकांना सुट्टी असणार का? जाणून घ्या अपडेट
Ganesh Chaturthi Stock Market : गणेश चतुर्थीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. गणरायाच्या आगमनामुळं बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळत असून उत्साहाचं वातावरण आहे.

Stock Market News मुंबई: जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. या आठवड्यात शेअर बाजारात कामकाज केवळ चार दिवस सुरु राहणार आहे. साधारणपणे पाच दिवस शेअर बाजारात कामकाज सुरु असतं. मात्र, 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीला शेअर बाजाराला सुट्टी असेल. म्हणजेच 27 ऑगस्टला गुंतवणूकदार शेअर खरेदी करु शकणार नाहीत किंवा विकू शकणार नाही. ट्रेडिंग संदर्भातील कोणताही व्यवहार होणार नाहीत.
गणेश चतुर्थीला शेअर बाजार बंद राहणार
देशांतर्गत बाजाराला सुट्टी असल्यानं आंतरराष्ट्रीय बाजार देखील बंद राहतील. विदेशी स्टॉक मार्केटस सर्वसाधारणपणे सुरु राहील. तिथं होणाऱ्या घडामोंडी घरेलू बाजार में अवकाश का मतलब यह नहीं है कि अंतरराष्ट्रीय बाजार भी बंद रहेंगे. विदेशी स्टॉक मार्केट्स सामान्य रूप से खुले रहेंगे और वहां होने वाली हलचल का असर भारतीय बाजार के अगले कारोबारी दिन पर जरूर दिख सकता है.
बँकांना कुठं सुट्टी असणार?
बँकांचा विचार केला असता काही ठिकाणी सुट्टी असणार नाही. मुंबई, अहमदाबाद, भुवनेश्वर, पणजी, विजयवाडा आणि हैदराबादमध्ये बँकांना सु्ट्टी असेल. या राज्यांमध्ये रोख रक्कम काढणं, पैसे जमा करणं, कर्ज प्रक्रिया आणि चेक क्लिअरन्स सारख्या सेवा प्रभावित होतील.
यापूर्वी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवसानिमित्त शेअर बाजार बंद होता. येत्या काळात 2 ऑक्टोबरला गांधी जंयती, 21 आणि22 ऑक्टोबरला दिवाळीनिमित्त सुट्टी असेल. दिवाळीच्या दिवशी परंपरेनुसार मुहूर्त ट्रेडिंग 1 तास सुरु राहील. याशिवाय 5 नोव्हेंबर प्रकाश गुरुपर्व, 25 डिसेंबरला ख्रिसमला शेअर बाजार बंद राहील.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























