एक्स्प्लोर
Massive Fire: Bhiwandi मधील मंगलमूर्ती डाईंग जळून खाक, मोठ्या प्रमाणात धूराचे लोट, लाखोंचं नुकसान
भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील सरवली एमआयडीसी (Saravali MIDC) परिसरातील मंगलमूर्ती डाईंग (Mangalmurti Dyeing) कंपनीला भीषण आग लागल्याने संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. 'आगीमुळे उठलेला धूर जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरावरून दिसत होता,' अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे. या कंपनीमध्ये कपड्यांचा मोठा साठा असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. ही आग विझवण्यासाठी भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
महाराष्ट्र
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















