Marathwada Flood : विदर्भ मराठवाडा यांना जोडणाऱ्या पुलावरून 35 तासानंतर वाहतूक सुरू ABP Majha
विदर्भ मराठवाडा यांना जोडणाऱ्या पुलावरून 35 तास नंतर वाहतूक सुरू पैनगंगा नदीला पूर असल्याने आणि नदीवरील पुलावरून पाणी असल्याने 35 तास पासून वाहतूक थांबली होती. उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव जवळ मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या साधारण 35 तास नंतर वाहतूक सुरू झाली. तर आज नुकसान ग्रस्त भागात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली पाहणी जिल्ह्यात गेल्या 6 दिवसापासून पाऊस सुरू होता त्यामुळे जिल्ह्यातील उमरखेड, महागाव , पुसद तालुक्यात शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून मानसिकदृष्ट्या खचून गेले या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानी ची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज उमरखेड , महागाव या तालुक्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली शिवाय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली उमरखेड च्या दहागाव पूल आणि मार्लेगाव पूल ची पाहणी केली 2 दिवस पूर्वी दहागाव येथे नाल्याच्या पुरात बस वाहून गेली होती त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता तर मार्लेगाव येथे पैनगंगा नदीवर पूल आहे त्या पुलावरून पाणी असल्याने 35 तास पासून विदर्भ- मराठवाडा अशी वाहतूक थांबली होती त्या दोन्ही ठिकाणी केली जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी