Maratha Reservation : केंद्राने कातडी बचाव धोरण स्वीकारु नये : अशोक चव्हाण
Maratha Reservation : केंद्राने कातडी बचाव धोरण स्वीकारु नये : अशोक चव्हाण
मराठा आरक्षणासह देशभरातील इतरही राज्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने कातडी बचाव धोरण स्वीकारू नये. तर 102 व्या घटना दुरुस्ती सोबतच इंद्रा साहनी प्रकरणातील 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या निवाड्याच्या फेरविचारासाठीही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी, अशी मागणी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
102 व्या घटना दुरुस्ती बाबत केंद्र सरकारच्या फेरविचार याचिकेवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. देशभरातील विविध राज्यांची आरक्षणे आणि राज्यांचे अधिकार वाचवण्यासाठी १०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच 50 टक्के आरक्षण मर्यादेचा मुद्दाही निकाली निघणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राने या दोन्ही मुद्यांवर केंद्राचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेळीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. राज्य सरकार पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. त्याची दखल घेत कदाचित केंद्र सरकार 102 व्या घटना दुरुस्तीबाबत 'देर आये दुरुस्त आये' आल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)