Manoj Jarange Jalna : मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी नादी लागू नये, 8 जूनला अंतरवालीत उपोषण करणारच
Manoj Jarange Jalna : मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी नादी लागू नये, 8 जूनला अंतरवालीत उपोषण करणारच
८ जूनला अंतरवाली सराटीतच आंदोलन करणार असा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय. आपण राजकारणात नाही, त्यामुळे कोणाला पाडा म्हणालो नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आपल्या नादी लागू नये असं ते म्हणाले.
माझ्या माय बाप मराठा समाजाचा फॅक्टर आहे. मराठा समाजाच्या मतांची किंमत येणं महत्वाचे होते. आमच्या मतांची किंमत नव्हती. मराठा समजाचा डर निर्माण झाला. कोण निवडून आले पडले याच्यात आम्हाला काही देणंघेणं नाही. बजरंग सोनवणे भेटायला आले, इथे सर्वच भेटायला येतात. मी कधीच म्हणालो नाही की भाजपला पाडा किंवा महाविकास आघाडीला निवडून आणा लोक म्हणायचे सभा होतात, पण मतात रूपांतर होत नाही. पण मराठ्यांच्या सभाचा मतात रूपं6 झाले. देशातला मराठा जागा झाला होता. मोठ्या जाती सम्पवण्याचा प्रयत्न होता. आता मराठा मताला घाबरायला लागले... मी कुणाला पाडा म्हणालो नाही. कुणाला पाडा किंवा निवडून आणा असे मी म्हटले होते. फक्त असे पाडा की मराठा मतांची भीती वाटायला पाहिजे असे सांगितले होते. मी पंकजा मुंडे आणि दानवे यांना पाडा असे कधीच म्हटले नव्हते. सगेसोयरे कायदा काढा अशी मागणी आहे. पाच महिने होऊन कायदा होत नाही. आम्हाला ठरल्या प्रमाणे द्या अशी विनंती मुख्यमंत्री आणि फडणवीस यांना करतो. माझ्याविरोधात काड्या करायला बंद करा. माझे लोक फोडण्याचे काम करू नका. आरक्षण मिळाले नाही तर सर्व जातीचे 288 उमेदवार विधानसभा निवडणुकीत उतरवणार आहे. सरकारला 8 तारखेपर्यत वेळ दिला आहे. त्यानंतर मरेपर्यंत उपोषण करणार आहे. आंदोलन अंतरवाली सराटीमध्येच होणार