Manoj Jarange : 20 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना मतदारसंघाच्या डेटासाठी अंतरवालीत बोलावलं
Manoj Jarange : 20 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना मतदारसंघाच्या डेटासाठी अंतरवालीत बोलावलं
Manoj Jarange Patil नाशिक : राज्यात आणि केंद्रात मराठ्यांची शक्ती वाढवायची असेल तर आपली मुलं बाळ आपल्या डोळ्यापुढे ठेवली पाहिजेत. त्यासाठी आरक्षण (Maratha Reservation) हेच मराठ्यांना मोठं करू शकतं, हे लक्षात ठेवा. राजकीय नेत्यांच्या नादाला लागून आपल्या मुलाबाळांचे भविष्य अंधकारात टाकू नका, सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून मराठ्यांना उघडं पाडण्याचा षडयंत्र रचलं आहे. असं होत असताना तुम्ही पक्षाच्या बाजूने बोलताच कसे? मराठ्यांनी आता तरी भान ठेवा, 29 ऑगस्टला लढायचे ठरलं तर पूर्ण ताकतीने काम करा. राजकीय पक्षाच्या त्रासाकडे अजिबात लक्ष देऊ नका. पाडायचं असले तर पाडा, आणि निवडून द्यायचे तर निवडून द्या.
मात्र येत्या 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान सर्वांनी आपला डाटा घेऊन आंतरवाली सराटीत एकत्र या, असे आवाहन मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या शांतता रालीची सांगता आज नाशिक येथे होत आहे. या सभेतून जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह सरकारवर जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.