Mann Suddha Tujha Season 2 : आय ॲम विथ यू | मन सुद्ध तुझं | Episode 1
Mann Suddha Tujha Season 2 : आय ॲम विथ यू | मन सुद्ध तुझं | Episode 1
'एबीपी माझा'च्या महाकट्टा या कार्यक्रमात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni) आणि लेखक प्रशांत दळवी (Prashant Dalvi) ही जोडगोळी सहभागी झाली. दरम्यान चंद्रकांत कुलकर्णी यांनी मोठी घोषणा केली होती. त्यानुसार 'एबीपी माझा'च्या 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
एबीपी माझाच्या माझा महाकट्टा या कार्यक्रमात चंद्रकांत कुलकर्णी यांनी 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर केलं होतं. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेच्या लेखन, दिग्दर्शनाची धुरा चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांभाळली होती.
चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले होते की,"जिगीषाला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. सध्या संस्थेची सहा नाटकं सुरू आहेत. सातत्याने नाटक सुरू असण्याची गंमत अशी आहे की, माझ्याबाबतीत असं झालं आहे की, पहिलं नाटक बसवल्यानंतर ते सुरू आहे आणि दुसरं आल्यानंतरही ते सुरुच आहे. एकाच वेळी वेग-वेगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं ही चांगली बाब आहे. पूर्वी फक्त काम पोहोचत होतं. पण आता नव्या माध्यमामुळे आमचे चेहरेदेखील प्रेक्षकांना दिसत आहेत. माझा कट्ट्यासारख्या कार्यक्रमांमुळे आमच्या लोकप्रियतेत आणखी वाढ होते".
दरम्यान, या मालिकेचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा दुसऱ्या भागालाही प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.